बाबा - त्वा परत या पयजे
*बाबा - त्वा परत या पयजे* साळाला सुट्या लागल्या. मी ज्याम खुस. आजेच्या मांग नळीकून फिरता यईल म्हणून. आज्याबरबर फिराया मला पुरी मज्या येची. कंदी यकदाश्या सुट्या लागथील आसा मला व्हयाचा. मी आमच्या घरात समद्यात बारीक. मंग आजाय मला पक्का जीव लावायचा. रानातून काई आणला का पयला मला द्याचा. आन मी नसलो तं मया वाट्याचा काडून ठुवायचा. आमचा आजाय लय उदेगी. सदानीत काई ना कई करीत रयाचा. म्हतारा झाला आसं पण कामाला लय ताटम. मला कयाचा कळाताय पण सगळीच लॉखा म्हणायची. मी काय पयलीला आसं तवा. आमाली भातय कमीच व्हयाचा तवा. नळीकं नागलीचा आन वरयचा दळा रयाचा. पोंडीचे आंब्याकूण नागली रयेची आन शेंदरे आंबेचे बाजूला वरय. राच्ची ज्यावना चाल्ली व्हती. आईना तयेवरलं भजे केलं आसंत. मला ज्याम आवडायचं. मी ज्याम चईना खाई आन भाव तेच्यातला कांदा काडून टाखायचे मांग लागला आसं. त्याला कांदा आजीबात नसं आवडंत. ज्यावता ज्यावत म्या बाबाला म्हणला, "बाबा, उंद्या मला नळीक नी भरका त्वे बरबर." बाबा म्हणाला, "हा." मी ज्याम खुस झालो. आन मया डोक्यात उंद्याचा पिचेर सुरू झा...